जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त आत्मकथा
Share
जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त आत्मकथा
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
नमस्कार मित्रा,
★ जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त -
सकाळी गजर वाजला उठून बघितलं, घड्याळात ७ वाजले होते. तो गजर बंद करून परत झोपलो. अचानक आवाज आला, 'अरे उठ किती झोपतोस!' मी घाबरलो. घरात कुणीच नसताना कोण बोललं.
'अरे मी बोलतोय मी, तुझे घड्याळ. आज तुझ्याशी बोलावसं वाटलं. तुझ्या वडिलांनी मला एका इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानात खरेदी केलेले. तेंव्हापासून आजपर्यंत तुमच्या घराची सेवाच करत आलेलो आहे. ९ वर्ष उलटली तुझ्या वडिलांचं निधन झालं आईला तू घरातून हाकलून दिल. या सर्व गोष्टीला मी अभागीपणे साक्ष देत होतो. त्या ममतेने अश्रू अजून माझ्या डोळ्यात भरून आहे.'
'तू माझा नियमित वापर करतो. येताजाताना वेळ बघण्यासाठी उपयोग करतो. ऑफिसला जाण्यासाठी अलार्म सेट करतो. तुझ्या आनंदातच माझा आनंद. परंतु आता मी जुना झालोय. कधी बॅटरी संपते तर कधी माझे तीन काटे एकमेकांत अडकतात. परंतु एका चांगल्या गुरुसारखा तू माझा त्याग केला नाहीस अजून.'
'परंतु एक दिवस असा येईल जेव्हा मला बदलणं तुझी गरज होईल. तो क्षण दोघांसाठीही दुखदायी असेल. चल जा तू ऑफिसला मीही माझं काम करतो. बाय बाय...' आणि मग तो आवाज पुन्हा नाहीसा झाला.
धन्यवाद...
■■ जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त■■
नमस्कार मित्रांनो! मी तुम्हाला वेळ दाखवणारा, तुमची मदत करणारा, तुमचा साथी घड्याळ बोलत आहे.
माझा जन्म एका कारखान्यात झाला होता. तिथे माझ्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे, रंगाचे व डिज़ाइनचे घड्याळ होते. तिथून आम्हाला एका दुकानात विकण्यासाठी आणले गेले.
माझ्या गुलाबी रंगाच्या चामडी पट्टयामुळे आणि सुंदर डिज़ाइनमुळे एके दिवशी एका मुलीने मला लगेच विकत घेतले. मी तेव्हा खूप खुश होतो.
माझी मालकिणीने लगेच मला तिच्या मनगटावर घातले. दुसऱ्या दिवशी शाळेत ती मला मनगटावर घालून गेली होती. तिच्या सगळ्या मैत्रिणींनी माझी स्तुती केली. मी तिच्या खूप उपयोगी पडायचो. माझ्या अलार्ममुळे तिला अभ्यासात, सकाळी उठायला खूप मदत व्हायची. परिक्षेच्या वेळी सुद्धा मी तिला खूप मदत करायचो.
पण एके दिवशी मी तिच्या हातातून चूकून पाण्यात पडलो व मी बिघड़लो. तिने मला दुरुस्त करायला एका दुकानात नेले,पण मी काही दुरुस्त होऊ शकलो नाही. तेव्हा मी खूप दुखी झालो.
मी बिघडल्यामुळे तिने मला फेकून दिले आणि एक नवीन घड्याळ आणले. त्या दिवशी मी खूप रडत होतो. पण, माझ्या मालकिणीला मी मदत केली याचा मला समाधान वाटतो.